“ दुःखी आत्म्यांचा चंदन लेप तू. परमात्म्याचे सुंदर रुप तू. देवात्म्याचा अंश धरेवर. सात्विकतेचे प्रतीक तू.
कर्करोगाच्या पेशी रुजल्या, जीवन – मृत्यू झुंज सुरू. पुण्य आमचे फळास आले. डॉ. रमाकांत आम्हा मिळाले.
अंत आमचा होता निश्चित. जीवनदान तू आम्हा दिले. निस्वार्थी,निर्विकार तुझी ख्याती. पुर्व जन्मीची संचित प्राप्ती.
धन्य माता-पिता ज्यांचा रमाकांत लाल. भाग्यवान ‘अश्विनी सौभाग्य कांक्षिणि. कुलभूषण ,कन्यारत्न कुटूंबा अभिमान. विद्वत्तमहती, महत्त्वाकांक्षी. समाज बांधव नतमस्तक नाती. सगे-सोयरे तुझ्याभोवती.
उभ्या आयुष्यात तुझी ऋणी, औक्षवानात तुझ्या मोती दानाची पर्वणी. आयुष्यमान,शुभ आशिष वर्षाव अगणित, सांज,सकाळी ‘समई प्रज्वल्लित.”
सौ.वर्षा प्र. पन्नासे.
- Dr. Ramakant Tayade (Carcinogens)